उपजिल्हाधिका:यांचा तास
By admin | Published: November 25, 2014 11:23 PM2014-11-25T23:23:22+5:302014-11-25T23:23:22+5:30
‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमाचे औचित्य साधून पुणो जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे यांनी नुकतीच भेट देऊन उपस्थिती दर्शविली.
Next
खोर : खोर (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमाचे औचित्य साधून पुणो जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे यांनी नुकतीच भेट देऊन उपस्थिती दर्शविली.
पुणो जिल्हा परिषदेने या वर्षी प्रथमच सुरू केलेल्या ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमाला जिल्ह्यामधून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा उपक्रम या वर्षी 2क् नोव्हेंबर रोजी झाला. त्यानंतर 19 डिसेंबर 2क्14 व पुढील वर्षी 15 जानेवारी 2क्15 रोजी तो पार पडेल. विद्याथ्र्याची आजयर्पयत फक्त पदाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची नुसती नावाने ओळख होती. मात्र, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्याथ्र्याना प्रत्यक्षात समोरासमोर येऊन त्यांचे अध्यापान, परिपाठ, मूल्यमापन, शाळेचा एकंदरीत संपूर्ण आढावा घेता येतो.
खोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे, विस्ताराधिकारी जर्नादन सिंगण यांनी ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमाच्या निमित्ताने येऊन या शाळांचा संपूर्ण आढावा घेतला. यामध्ये सकाळपासूनच 1क् ते दुपारी 3 या वेळेत साफसफाई, परिपाठामध्ये सहभाग, शाळेच्या 1क् भौतिक सुविधांचे मूल्यमापन, शालेय पोषण आहार, त्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन विद्याथ्र्याची बौद्धिक तपासणी केली. विद्याथ्र्याची प्रगती पाहता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी इंग्रजी विषयाचे न अडखळता वाचन केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी या उपक्रमाला ग्रामस्थांचादेखील सहभाग लाभला होता.
बाल स्वच्छता मोहीम, स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय, त्याचप्रमाणो आता ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम शासनाने हाती घेतल्याने विद्याथ्र्याच्या शालेय प्रगतीला एक प्रकारे वाव मिळताना दिसत आहे.
या वेळी उपसरपंच विजय कुदळे, वरवंड-देऊळगावगाडा केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत कुतवळ, खुटबावचे केंद्रप्रमुख कडके सर, मुख्याध्यापक दादाजी सावकार, मुख्याध्यापक अंकुश काळखेरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
4बाल स्वच्छता मोहीम, स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय, त्याचप्रमाणो आता ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम शासनाने हाती घेतल्याने विद्याथ्र्याच्या शालेय प्रगतीला एक प्रकारे वाव मिळताना दिसत आहे.