रंगला सुबोध भावेच्या गप्पांचा ‘तास’....

By admin | Published: June 19, 2017 05:17 AM2017-06-19T05:17:22+5:302017-06-19T05:17:22+5:30

सोशल मीडिया, मार्कस, लाइक्स व इतरांचे आपल्याबद्दलचे मत यापलीकडे जाऊन स्वत:चा शोध घेण्याची गरज, आपल्याला नक्की काय जमतं, काय केल्याने

Subhash Bhave's clips 'hour' to Rang | रंगला सुबोध भावेच्या गप्पांचा ‘तास’....

रंगला सुबोध भावेच्या गप्पांचा ‘तास’....

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोशल मीडिया, मार्कस, लाइक्स व इतरांचे आपल्याबद्दलचे मत यापलीकडे जाऊन स्वत:चा शोध घेण्याची गरज, आपल्याला नक्की काय जमतं, काय केल्याने आपल्याला आनंद मिळतो त्याचा शोध व पाठपुरावा, तसे केल्याने मिळणारे समाधान...हे तो सांगत होता आणि मुले त्याचे प्रत्येक बोलणं मन लावून ऐकत होती.. तो अभिनय नव्हता तर तो संवाद होता एकमेकांशी..आपला सूर पकडता आला की जीवनाचे गाणे सुरेल होते, अशा शब्दांतून बालगंधर्व फेम सुबोध भावे याने ‘जीवनगाणे’ उलगडले.
दहावी-बारावीचे निकाल जाहीर होण्याच्या सुमारास हमखास बातमी येते ती परीक्षेतील अपयशाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची. याला कारण असतो तो त्याच्यावरील दबाव व एखाद्या जिवापेक्षा मार्कांना दिलेलं अकारण अवास्तव महत्त्व!
आपल्या पाल्याला समाधानकारक मार्क मिळत नसतील तर वाटणारी लाज, त्यातून पालक व पाल्यात येणारी उद्विग्नता व या सर्वांना खतपाणी घालणारा पालक आणि पाल्यांमधील विसंवाद व अविश्वास या सर्व बाबींवर अगदी मोकळ्या वातावरणात चर्चा करण्यासाठी सुबोधने पुढाकार घेतला होता. ‘संवाद - गप्पा आणि बरंच काही’ या उपक्रमाचा पहिला भाग नुकताच ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडला.
सुबोध भावे फॅन क्लब व वाईड विंग्स मीडिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पावसाने जोर लावला असूनही, प्रेक्षकांच्या संख्येवर त्याचा काही परिणाम झाला नाही यातच या विषयाच्या गरजेचे महत्त्व लक्षात येते.
सुबोधचा वर्गमित्र व शालेय मुलांमधे विवेकी विचार वर्ग घेणारे
डॉ. अमित करकरेदेखील या उपक्रमात सुबोधबरोबर सहभागी झाले आहेत. आपल्या मानसिकतेमधली समाजाकडून मान्यता मिळवण्याची धडपड व त्यासाठी प्रचलित गोष्टींना बळी पडण्याची शक्यता यावर अमित करकरे यांनी मत मांडले.
काय करतोय यापेक्षा का करतोय, या प्रश्नाचे महत्त्व त्यांनी
अधोरेखित केले.

Web Title: Subhash Bhave's clips 'hour' to Rang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.