सुभाषचंद्र बोस बोस यांनी इंग्रज सत्तेचा बीमोड केला : संभाजी नाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:42+5:302021-01-25T04:13:42+5:30
गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ...
गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ही सिंहगर्जना भारताच्या कानाकोप-यात घुमली.आझाद हिंद सेनेची स्थापना करुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले..नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज सत्तेचा बिमोड केला असे प्रतिपादन वीर नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर यांनी केली.
भिवरी येथील वीर नेताजी तरुण मंडळ व वीर नेताजी क्रिडा मंडळ यांच्यावतीने सुभाषचंद्र बोस यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले पुरंदर वरून वीर नेताजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुभाषज्योत आणली.सुभाषज्योत मिरवणूक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.नाटकर बोलत होते.
यावेळी धनंजय चौधरी,नामदेव ढवळे,रामदास कटके , शहाजी लोणकर ,दत्ताञय ताम्हाणे ,जगन्नाथ कटके,म्हस्कू दळवी, सखाराम कटके, भाऊसाहेब कटके, बाळासाहेब कटके, सुहास कटके ,अशोक जगदाळे , राहुल कटके ,सुभाष लोणकर,आप्पासाहेब सावंत, किरण कटके, गौतम बागमार ,ललितकुमार मानकर , मोहन कटके,एस.पी.दळवी,नानासाहेब येळवंडे आदीसह कार्यकर्ते ,भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार संजय जगताप यांनी भिवरी येथे येवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती चिरंतन टिकून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा व समाज संघटित होवून समाजसुधारणा व्हावी या उद्देशाने तत्कालीन पदाधिका-यांनी १९६८ साली वीर नेताजी मंडळाची स्थापना केली.तेव्हापासून आजपर्यंत त्या उद्देशाप्रमाणे अखंडीतपणे सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असल्याचे माऊली दळवी सांगितले. प्रास्तविक बाबाजी घिसरे यांनी केले.सुञसंचालन माऊली घारे यांनी केले.आभार अभिजीत दळवी यांनी मानले.
भिवरी (ता.पुरंदर ) येथे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी संभाजी नाटकर व वीर नेताजी मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते .