संस्कार विषय अभ्यासक्रमात हवा
By admin | Published: May 3, 2017 01:33 AM2017-05-03T01:33:47+5:302017-05-03T01:33:47+5:30
महिलांवरील वाढते हल्ले चिंतेची बाब आहे. गुन्हेगाराला जात-धर्म नसतो़ त्यामुळे अशा हल्ल्याच्या वेळी केवळ प्रशासन आणि
महिलांवरील वाढते हल्ले चिंतेची बाब आहे. गुन्हेगाराला जात-धर्म नसतो़ त्यामुळे अशा हल्ल्याच्या वेळी केवळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला जबाबदार न धरता सर्वांनीच कठोर स्वयंशिस्त लावÞणेदेखील गरजेचे आहे. तर शासनाने किशोरवयीन संस्कार हा विषयच अभ्यासक्रमात सहभागी करीत महाविद्यालयांना हे संस्कारवर्ग चालविणे सक्तीचे करावे. या संस्काराच्या पगडामुळे आपोआपच विद्यार्थ्यांचे पाय वाकडे न पडता अशा घटनांना पायबंद बसेल, असे ताथवडे येथील इंदिरा शिक्षण समूहाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांनी सांगितले.
तरिता शंकर म्हणाल्या, अश्विनी बोदकुरवार सारख्या अनेक दुर्दैवी मुली प्रेमाच्या नकारात्मकतेतून हल्ल्यासारख्या घटनांना बळी पडतात किशोरवयीन मुला-मुलींचे प्रबोधन करणे, संस्कार करण्याची गरज आहे. लहान मुलांच्या संस्कार वर्गाच्या धर्तीवर किशोर विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग चालू करावेत, केवळ संस्कारच अनिष्ट विचारांपासून विद्यार्थ्यांना रोखू शकतात. अभ्यासक्रमातील विषयांबरोबर संस्कार हा विषय सर्व महाविद्यालयांना सक्तीचा करावा. त्या विषयांना मार्क असावेत आणि विद्यालयाच्या देखील संस्कार विषयातील गुणात्मक बाबी किंवा देण्यात आलेल्या गुणावरून त्यांचे मानांकन ठरवावे, त्यांची मान्यता कायम करण्याचे धोरण अवलंबावे, असे मला वाटते. ’’
कितीही सीसीटीव्ही बसावा, सुरक्षा रक्षक वाढवा मात्र, गुन्हेगार हा संधीची वाट पाहत असतो. अशा घटना घडू नये, म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत गुन्हेगार आणि फिर्यादींना त्या जागी योग्य ती वागणूक द्यावी, केवळ आमुक तमुक मोठ्या घरातला मुलावर हल्ला झाला. म्हणून त्याचा गाजावाजा करणे किंवा आरोपी अमुक तमुक मंत्र्याचा, राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक म्हणून त्याला कायद्यात आणि वागणुकीत सूट देणे हे चुकीचे आहे. जी पीडित आहे, तीसुद्धा एक मुलगीच आहे आणि सर्व सामान्य घरातील देखील मुलीच असतात त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान या हेतूने तत्परतेने ती घटना हाताळली गेली पाहिजे, असे सांगून तरिता शंकर म्हणाल्या, ‘‘ सोशल मीडिया सध्या आपण पाहत असलेल्या डिजिटल इंडियाचा आधारभूत आणि महत्त्वाचा घटक आहे. मूलभूत गरजांबरोबर सोशल मीडिया ही एक मूलभूत गरज बनली आहे. मात्र प्रत्येकाने या सोशल मीडियाचा किती आणि कसा वापर करावा, हे ठरविणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन मुली, महिलांत आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या अनेक क्लिपदेखील व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर योग्य आणि हव्या त्या कामासाठीच करायला हवा तशी बंधने घालणे गरजेचे आहे. ’’
आपल्या मुलांना काय करायचं आहे, त्यांना काय शिकण्यात आणि करण्यात रस आहे याबाबत विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही मानसिकता बदलत आहे. त्यानुसार पालक आज त्यांना स्वातंत्र्य देत आहेत त्यांनी ते द्यावंही. पूर्वी वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असे आता याबरोबरच आर्किटेक्चर, फार्मसी, एमबीए, बीसीएस, बीएससी, मॅनेजमेंट आदी शिक्षणाकडे कल वाढला आहे या शिक्षणात नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खासगी हॉस्टेलची संख्या अफाट आहे मात्र हॉस्टेल मालकांनी नियम आणि अटी कडक कराव्यात व विद्यार्थ्यांनी स्वत:ला स्वयंशिस्त लावत मनावर बंधने घालणे गरजेचे आहे.’’