पोटगी द्यावी लागू नये, म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर -पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:48+5:302021-08-27T04:13:48+5:30

पुणे : पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून कौटुंबिक न्यायालयात ...

Submission of alimony should not be enforced, so forged documents are submitted in the court - a case is filed against the husband and father-in-law | पोटगी द्यावी लागू नये, म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर -पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल

पोटगी द्यावी लागू नये, म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर -पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासऱ्याविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अनंत रमेश पाबळे (वय ४०) आणि रमेश केशव पावळे (वय ७२, दोघे रा. टेल्को कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर येथील एका ३८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कौटुंबिक न्यायालयात त्यांचा पोटगीचा खटला सुरू आहे. या खटल्यात अनंत पाबळे यांनी ८ नोव्हेंबर २०१९ रोजी काही एस्तऐवज सादर केले. त्यात फिर्यादी यांना पोटगी मिळू नये, म्हणून त्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहेत, असा खोटा दस्तऐवज बनवून तो शिवाजीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात सादर केला. तो खरा आहे, असे न्यायालयास सांगून त्यांनी फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Submission of alimony should not be enforced, so forged documents are submitted in the court - a case is filed against the husband and father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.