नदी सुधारणेचा आराखडा सादर करा
By admin | Published: July 8, 2017 02:45 AM2017-07-08T02:45:09+5:302017-07-08T02:45:09+5:30
नदीचे संवर्धन हा नागरिकांच्या जिव्हाळ््याचा विषय बनला पाहिजे. राम नदीला जीवनदान देण्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
बाणेर : नदीचे संवर्धन हा नागरिकांच्या जिव्हाळ््याचा विषय बनला पाहिजे. राम नदीला जीवनदान देण्यासाठी प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकांनी एकत्र येत राम नदी सुधारणेचा सर्वंकष आराखडा येत्या १५ दिवसांत मला सादर करा. जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी रुपये यासाठी मंजूर करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. राम नदीकाठी उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर, बाणेर नागरी सहकारी पतसंस्था, योगीराज नागरी सहकारी पतसंस्था, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, वसुंधरा स्वच्छता अभियान, बाणेर, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री गिरीश बापट व आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.