सिंहगड रोड उड्डाणपूल येथे भुयारी मार्ग अशक्य; तापकीर - मिसाळ यांच्यात वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:34 PM2022-12-03T13:34:16+5:302022-12-03T13:35:32+5:30

सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली...

Subway impossible at Sinhagad Road flyover; Opinion of Municipal Administration | सिंहगड रोड उड्डाणपूल येथे भुयारी मार्ग अशक्य; तापकीर - मिसाळ यांच्यात वाद

सिंहगड रोड उड्डाणपूल येथे भुयारी मार्ग अशक्य; तापकीर - मिसाळ यांच्यात वाद

googlenewsNext

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असून, ते २५ टक्के झाले आहे. आता या उड्डाणपुलाच्या येथे भुयारी मार्ग करणे अशक्य असल्याचे मत पालिका प्रशासनाने व्यक्त केले. त्यावर याबाबत त्रयस्थ सल्लागार नेमून भुयारी मार्ग करता येईल, याची शक्यता पडताळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल बांधताना स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. येथे एक भुयारी मार्ग करावा, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली. त्यावर नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, या दृष्टीने आराखड्यात काही बदल करावयाचा झाल्यास अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. उड्डाणपूल बांधताना पर्यायी रस्ते नागरिकांना उपलब्ध होतील, याकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी असणारी खाऊ गल्ली, अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

तापकीर - मिसाळ यांच्यात वाद

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल करताना, तेथे एक भुयारी मार्ग करावा, अशी मागणी भाजपच्या आमदार भीमराव तापकीर यांनी केली. त्यावर आता भुयारी मार्ग करणे शक्य नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तरीही तापकीर यांनी भुयारी मार्गाची जोरदार मागणी केली. त्यावर हा उड्डाणपूल मी आणला आहे. या उड्डाणपुलाचे सादरीकरण केले. त्यावेळी भुयारी मार्गाची मागणी का केली नाही, असा सवाल भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केला. त्यावरून या दोन्ही आमदारांमध्ये वाद झाला. या वादावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकला.

Web Title: Subway impossible at Sinhagad Road flyover; Opinion of Municipal Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.