खून प्रकरणातील फरारी आरोपीला जेरबंद करण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:53+5:302021-04-12T04:09:53+5:30
याप्रकरणी मनोज लक्ष्मण साळवी ( वय ३०, रा. भोसरी, पुणे ) याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती ...
याप्रकरणी मनोज लक्ष्मण साळवी ( वय ३०, रा. भोसरी, पुणे ) याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार : मागील दोन महिन्यांपूर्वी लोणीकंद येथे सचिन शिंदे यांचा दिवसाढवळ्या डोक्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. परंतु मनोज साळवी हा अद्यापपर्यंत फरार होता.
शनिवार ( १० एप्रिल ) रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या पथकातील मोसिन शेख यांना सचिन शिंदे खून प्रकरणातील फरारी आरोपी साळवी हा त्या परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोणीकंद पोलीस ठाण्याच्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, राजेश पवार, हवालदार राजेंद्र मिरगे, अब्दुल शेख, ईश्वर जाधव, विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पथकाने केली.