चिकाटीच्या जोरावर यश निश्चित : शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:14+5:302021-08-13T04:13:14+5:30

वडगाव रासाई येथील छत्रपती विद्यालयात विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांची ३४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ...

Success is assured through perseverance: Shelar | चिकाटीच्या जोरावर यश निश्चित : शेलार

चिकाटीच्या जोरावर यश निश्चित : शेलार

Next

वडगाव रासाई येथील छत्रपती विद्यालयात विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांची ३४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी दहावीमध्ये साक्षी नंदकुमार घोरपडे हिने १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. पूनम संदीप लष्करे हिने ९७ टक्के मिळवत द्वितीय व प्रणाली मानसिंग जगताप हिने ९६.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. बारावी इयत्तेत मनीषा विठ्ठल बारवकर हिने ८९.३३ टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक, प्रतीक्षा सुभाष ढवळे हिने द्वितीय क्रमांक मिळवत ८६.५ टक्के गुण प्राप्त केले. तर प्रदीप संतोष धोंडे याने ८४.८३ गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालय व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करत कौतुक करण्यात आले.

सचिन शेलार यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अडचणीत नेहमी मदत करणार असल्याचे सांगितले, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन परभाने यांनीही या यशाबद्दल विद्यार्थी व अध्यापकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या वेळी धनसिंग जगताप, नंदकुमार घोरपडे, संदीप लष्करे, बारवकर, विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रशेखर काकडे यांनी केले तर एस. के. बेलेकर यांनी आभार मानले.

Web Title: Success is assured through perseverance: Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.