रुग्णसंख्या कमी करण्यात भोर प्रशासनाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:18+5:302021-05-20T04:12:18+5:30
भोर तालुक्यात परिसरात आजअखेर ५ हजार २४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी सध्या १० कोविड सेंटरमध्ये ६५९ ...
भोर तालुक्यात परिसरात आजअखेर ५ हजार २४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी सध्या १० कोविड सेंटरमध्ये ६५९ एवढे उपचार घेत आहेत. आजअखेर बरे ४४८० झालेले रुग्ण. आत्तापर्यंत मृत्यू झालेले रुग्ण ११० आहेत. अनेकांवर यशस्वी उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. हीच ती प्रशासनाच्या कामाची पावती आहे.
भोरचे आमदार संग्राम थोपटे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कराळे, वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय बामणे, भोरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व सामाजिक संस्था, नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी योग्य नियोजन केल्याने रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
--
चौकट
--
महिनाभरात पाच लाखांचा दंड वसूल
१५ एप्रिल ते १८ मेपर्यंत विनामस्क ७५४ केसेस व विनापरवाना (ई पास) ५५ केसेस यांचा एकूण दंड ४ लाख १५ हजार दंड वसूल झाला आहे. तसेच १३ दुकाने सीलबंद करण्यात आली. ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई करत ४००० रुपये दंड वसूल केला. लग्नकार्यात जमाव जमवणेबद्दल एक कारवाई केली. ५० हजार दंड वसूल केला. एका बांधकाम व्यवसाय कारवाई १० हजार दंड, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक ०५ केसेस त्यांचा दंड ४५ हजार, तसेच १८८ प्रमाणे ०६ गुन्हे दाखल केले आहेत. भोर पोलिसांच्या वतीने ५ लाख २४ हजार एकूण दंड वसूल झाल्याचे माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यानी सांगितले. या वेळी अनिल हिप्परकर, अमोल मुऱ्हे उपस्थित होते.
--