काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 09:14 AM2020-06-07T09:14:41+5:302020-06-07T09:18:21+5:30

हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

Success in capturing third leopard in Katewadi; Panic among farmers in Baramati taluka | काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत

काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत

Next

बारामती - बारामती तालुक्यात काटेवाडी, कण्हेरी परिसरात तिसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी वन विभागाने परिसरात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात हा तिसरा बिबट्या कैद झाला. कैद झालेला मादी बिबट्या आहे. यापूर्वी नर आणि मादी बिबट्या पकडण्यात आले आहेत.

हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यांची संख्या नेमकी किती आहे, याबाबत शेतकऱ्यांनी अजूनही धास्ती घेतली आहे. तर वन विभाग देखील बिबट्यांच्या संख्येबाबत शोध घेत आहे. डिसेंबर २०१९ पासून बिबट्यांचा परिसरात वावर आहे. शेळी, मेंढीसह गायी आणि कुत्र्यांचा बिबट्यांनी फडशा पाडला. त्यामुळे परिसरात शेतकरी शेतात जाण्यास तयार नव्हते. ३० जानेवारीला पाहिला बिबट्या पकडण्यात विभागाला यश आले. त्यानंतर १३ फेब्रूवारीला दुसरा बिबट्या पकडण्यात आला. जवळपास चार महिन्यांनी चौथा बिबट्या सापडला आहे.

बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असल्याची माहिती पुढे आली असल्याने त्यांची नेमकी किती संख्या आहे याबाबत वन विभागाने खुलासा करण्याची गरज आहे. पहिला बिबट्या जेरबंद केलेल्या संतोष जाधव यांच्या शेती भागात  बिबट्याचा वावर होता. त्या ठिकाणापासून १०० फूट लांब लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे दुसरा बिबट्या कैद झाला होता. बिबट्याला पकडण्यासाठी जाधव यांच्याच शेतात लावलेल्या  कॅमेऱ्यात रविवारी (दि ७ ) पहाटे तिसरा बिबट्या कैद झाला हे विशेष. या बिबट्याला देखील मोठ्या पोलिस बंदोबस्तात बारामती येथे हलविण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ ,जानेवारी २०२० पासून बिबट्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी, लिम्टेक, कण्हेरी, ढेकळवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील लाकडी  येथे शेळ्या मेंढ्यांची शिकार केली होती. अजून बिबट्याचे जनावरांवर हल्ले सुरूच होते. मात्र , येथील माळावरील हरणांच्या शिकारी देखील बिबट्या करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली .

तालुक्यातील खंडज, निरावगज गावात बिबट्याने मेंढ्यांची शिकार केल्याचा येथील शेतकऱ्यांचा दावा आहे .या भागात पिंजरा लावण्यासाठी मागणी होत आहे. बिबट्याला  बारामती एमआयडीसीतील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात नेण्यात आले आहे बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बांधले; दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा

...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप

जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!

देशात कोरोनाचा प्रचंड कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?

Web Title: Success in capturing third leopard in Katewadi; Panic among farmers in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.