ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्कॉलरशिप परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:41+5:302020-12-02T04:04:41+5:30

इयत्ता पाचवीचा ८८. ३७ निकाल लागला असून यामध्ये तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थ्यांची नावे व कंसात गुण ...

Success in Dnyaneshwar Vidyalaya Scholarship Examination | ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्कॉलरशिप परीक्षेत यश

ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्कॉलरशिप परीक्षेत यश

Next

इयत्ता पाचवीचा ८८. ३७ निकाल लागला असून यामध्ये तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून विद्यार्थ्यांची नावे व कंसात गुण पुढीलप्रमाणे भक्ती राऊत (२५६), प्रणव शिंदे (२३८) व आदित्य कंकाळे (२३२) तसेच इयत्ता आठवी मध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांपैकी २८ उत्तीर्ण झाले. इयत्ता ८ वी चा ७० टक्के निकाल लागला असून यामध्ये आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. संस्कृती चव्हाण (२३८), आकांक्षा भुजबळ (२२६), अक्षदा गोमासे (२१२), शिवम तावडे (१९२), गौरव शेजुळ (१९०), पुनम दहिफळे (१९०), रोहन साबळे(१८६) व अजय रायसाखळे (१७०) गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, सर्व विश्वस्त तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले.

Web Title: Success in Dnyaneshwar Vidyalaya Scholarship Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.