शिक्षक संघाच्या लढ्याला यश, प्रशासनाधिकारी दिंडे यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:02+5:302021-07-11T04:09:02+5:30
बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दिंडे यांचेवर भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तत्काळ ...
बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी दिंडे यांचेवर भ्रष्टाचार व नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील शिक्षक संघाने नगरपालिका व उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. याशिवाय महिला शिक्षकांना सतत दडपणाखाली ठेवणे, कोविड नियम डावलून आजारी शिक्षकांची पिळवणूक करणे आदी तक्रारी शिक्षकांनी दाखल केल्या होत्या.
प्रशासन अधिकारी दिंडे आणि शिक्षकांची गेली दोन महिने संघर्ष चालू होता. आज या संघर्षाला सत्याचा कौल मिळाल्याचे देविदास ढोले यांनी सांगितले. याप्रकरणी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण दादा गुजर, बारामती शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष इम्तियाज शिकलकर, गटनेते सचिन सातव तसेच विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, नपामनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी खंबीर साथ दिली. त्यामुळे भ्रष्ट अधिका-यांना शिक्षा मिळाली. म्हणून बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षक संघ या सर्वांचे तसेच या लढ्यात एक दिलाने संघ शक्तीचे एकजुटीचे दर्शन घडविल्याचे देखील ढोले यांनी नमूद केले.
अजित पवारांच्या सूचनेनुसार बारामतीच्या मुख्याधिकारी यांनी तसेच शिक्षण उपसंचालक यांनी सदर प्रकरणी चौकशी केली होती. त्यामध्ये दिंडे या दोषी आढळल्यामुळे त्यांची निरंतर शिक्षण पुणे या ठिकाणी बदली करण्यात आल्याचे देविदास ढोले यांनी सांगितले.