जेईई मेन्समध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:31+5:302021-03-10T04:13:31+5:30
करोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई मेन्स परीक्षा चार टप्प्यात घेतली जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. या ...
करोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई मेन्स परीक्षा चार टप्प्यात घेतली जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालात देशातील सहा विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले. पुण्यातील अद्वैत रेगे, प्रियंका दाते, शुभराणी चटर्जी, रोहित नणवाणी, सजल देवळीकर, सोहम जोशी, सोहम निवारगी, अर्थव कुलकर्णी, श्रीनिवास किदंबी, जिनेश मेहता, नमन धर्मानी, नमन अगरवाल, आदित्य मेहता, अर्णव कलगुतकर, शिव पाटील यांनी 99.9 पर्सेंटाईल गुण मिळवत यश संपादन केले आहे.
जेईई मेन्स परीक्षा चार टप्प्यात होत असून येत्या 16 ते 18 मार्च दरम्यान दुस-या टप्प्यातील परीक्षा होणार आहे. जून महिन्यात ही परीक्षा संपणार आहे. त्यानंतर किती गुणांना किती पर्सेंटाइल हे प्रसिद्ध केले जाईल. प्रत्येक टप्प्यातील परीक्षेचे पर्सेंटाइल प्रसिद्ध करणे आवश्यक असून या निकालात जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी 85 पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थीसुध्दा पात्र ठरतील, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.