रांजणी विद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:04+5:302021-08-26T04:14:04+5:30
रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाच्या तीन खेळाडूंची पुणे जिल्हा संघात निवड झाली आहे. पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने नुकत्याच ...
रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाच्या तीन खेळाडूंची पुणे जिल्हा संघात निवड झाली आहे. पुणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने नुकत्याच सन्मित्र संघ, कोथरूड पुणे येथे कुमार-मुली वयोगटाच्या खो- खो निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल नरसिंह क्रीडा मंडळ रांजणीच्या श्वेता अशोक वाघ, प्रिया एकनाथ भोर, श्रावणी शशिकांत भोर या तीन खेळाडूंची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पैकी श्वेता अशोक वाघ हिची जिल्हा संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. निवड झालेले खेळाडू रयत शिक्षण संस्थेचे नरसिंह विद्यालय रांजणी येथे शिक्षण घेत असून राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. विद्यालयाच्या वतीने निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ भोर, बंडेश वाघ, प्राचार्य डी. टी. तोडकर, पर्यवेक्षक आर. पी. पडवळ, क्रीडा विभागप्रमुख राजू तायडे उपस्थित होते.
२५ मंचर रांजणी