तोफा गडावर चढविण्यात शिवप्रेमी संघटनांना यश

By admin | Published: January 11, 2017 02:53 AM2017-01-11T02:53:45+5:302017-01-11T02:53:45+5:30

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा गडावर घेऊन जाण्यात मावळ तालुक्यातील शिवप्रेमी संघटनांच्या शिलेदारांना यश आले.

Success for the Shivprideri organizations to bring the gun to the fort | तोफा गडावर चढविण्यात शिवप्रेमी संघटनांना यश

तोफा गडावर चढविण्यात शिवप्रेमी संघटनांना यश

Next

लोणावळा : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा गडावर घेऊन जाण्यात मावळ तालुक्यातील शिवप्रेमी संघटनांच्या शिलेदारांना यश आले. रविवार व सोमवार दोन दिवस विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोहगडाच्या पायथ्याजवळ पडलेल्या ३ तोफा गडावर चढविल्या. यापूर्वी ३ तोफा गडावर चढविण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवरायांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या मावळ प्रांतातील गड-किल्ले हे मराठ्याच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. या गड-किल्ल्यांचे संवर्धन  व रक्षण करण्यासाठी विविध  शिवप्रेमी संघटना कार्य करत  आहेत.
मागील काही दिवसांपासून गड संवर्धनाचे काम करणारी दुर्गविजय मावळ यांना लोहगडाच्या पायथ्याजवळ तीन तोफा मिळून आल्या होत्या. रविवारी व सोमवारी दुर्गविजय मावळ, सह्याद्रीचे शिलेदार, मावळ अँडव्हेंचर टीम, अनुशासन गडकिल्ले सुरक्षादल, श्री शिवशंभू प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान व मावळ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी सदर तोफा गडावर चढविल्या.
भारतीय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यास दोन्ही गडावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्याचा मानस या वेळी दुर्गप्रेमी व शिवप्रेमी संघटनांनी व्यक्त केली. तसेच गड-किल्ले परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपत
किल्ले परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले  आहे. मावळ तालुक्यातील किल्ले सुरक्षित राहावेत, यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे काम  करण्याची तयारी त्यांनी दशिर्विली आहे. (वार्ताहर)

Web Title: Success for the Shivprideri organizations to bring the gun to the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.