Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:02 PM2024-06-13T15:02:58+5:302024-06-13T15:18:55+5:30

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे....

Success Story: Life broke up at the age of 19, then became an IPS woman | Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

IPS Manjari Jaruhar Success Story: कमी वयात झालेले लग्न अन् काही दिवसांत नात्यात जर दुरावा आला तर कुठलाही माणूस खचतो. त्याला त्याच्या आयुष्यातील रस निघून गेल्याची जाणीव होते. खूपच कमी लोक लहान वयातील संकटावर मात करत आयुष्यात यशस्वी होतात. त्यामध्येच मंजरी जरुहर यांचे नाव घेतले जाते. ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही इतिहास रचला. मंजरी यांचे जीवन मोठ्या चढ-उतारांनी भरलेले आहे. त्यांची ही कहाणी देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरली. अनेक संकटांवर मात करत मंजरी जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी झाल्या.

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे. जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS आहेत. तसेच देशातील पहिल्या पाच महिला IPS अधिकाऱ्यांच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. पण, त्यांना इथपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं. सुशिक्षित कुटुंबातील असूनही वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र, काही दिवसांतच हे नातेही तुटले. तरीही त्यांनी हार न मानता दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली आणि त्यांनी आयपीएसची पोस्ट मिळवली.

'ठरवून यश मिळवलं'-

वैवाहिक जीवनातील अपयशानंतर मंजरी खचल्या. पण त्यावर त्यांनी मात करत स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेरित करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे आयएएस अधिकारी IAS) होण्याचे स्वप्न होते. नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी यासाठी मंजरी जरुहर दिल्लीला गेल्या. त्यानंतर, तेथील कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि युपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मंजरी यांना मेहनतीचे फळ मिळाले. त्या १९७६ मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या.

दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त-

मंजरी जरुहर यांनी १९७४ मध्ये पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली, ज्यामध्ये त्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यावर अपयश आले. यानंतर हार न मानता पुन्हा त्यांनी पहिल्यापासून तयारी सुरू केली. युपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. यंदा मात्र त्यांनी मुलाखतीची चांगली तयारी केल होती. त्यामुळे परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यात यश प्राप्त केले आणि १९७५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC ची परीक्षेत यश मिळवले. जहरूर यांना लहानपणापासूनच घरच्या कामात लक्ष देण्यास सांगितले जात होते. तसेच कुशल गृहिणी बनण्याचा सल्लाही वारंवर देण्यात येत होता. पण कमी वयात आलेल्या संकटांवर मात करत त्या युपीएससीची परीक्षा पास झाल्या आणि देशभरातील मुलींसाठी प्रेरणास्थान झाल्या.

दिल्ली विद्यापीठातून घेतले पदव्युत्तर शिक्षण-

IPS मंजरी जारुहर यांनी पाटणा महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या उद्देशाने दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अभ्यास करत दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच, नागरी सेवांच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंगमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

Web Title: Success Story: Life broke up at the age of 19, then became an IPS woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.