यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील   

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 03:26 PM2024-07-01T15:26:07+5:302024-07-01T15:26:37+5:30

आरआयटीच्या ग्लोबल मेळाव्यात १९८३ पासूनच्या १५७० माजी विद्यार्थ्यांचा सहभाग.

Successful alumni will make educational institutions successful says Jayant Patil | यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील   

यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील   

पुणे : इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिटयूटच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्लोबल स्नेह मेळाव्याचे आयोजन आर. आय. टी. माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने पुणे येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, करण्यात आले होते. यावेळी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले आरआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी गेल्या ४१ वर्षात जे यश मिळवले त्याचेच फलित म्हणून आरआयटी महाविद्यालयाने आज राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावरती नावलौकिक कमावलेला आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात गेले तरी आरआयटीचे माजी विद्यार्थी आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावरती कार्यरत असलेले दिसून येतात. यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतील आणि त्याचबरोबर नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज सर्वच उच्च शैक्षणिक संस्थांना माजी विद्यार्थ्यांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

यावेळी आरआयटीचे संचालक डॉ पी व्ही कडोले यांनी सांगितले की, आरआयटीच्या स्थापने पासून आरआयटीने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत, ग्रामीण अभियंता घडविण्याचे स्वप्न घेऊन मोजक्या अभियांत्रिकी शाखा सुरु केलेले महाविद्यालय आज जागतिक स्तरावरील ट्रेंडिंग अभियांत्रिकी शाखा जसे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, एआयएमएल आणि मेकेट्रॉनिकस याचे अभियंते घडवण्याचे काम करत आहे. या बरोबरच आरआयटीला एआयसीटीई कडून ट्विनिंग प्रोग्रॅम विथ फॉरन युनिव्हर्सिटी हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता मिळाली असून ट्विनिंग प्रोग्रॅम ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरआयटी मधील यूजी, पीजी आणि एमबीए अभ्यासक्रम आरआयटी व परदेशातील विद्यापीठ अशा दोन्ही ठिकाणी पूर्ण करण्याची सोय उपलब्ध असणार आहे आणि परदेशी विद्यापीठाची डिग्री मिळणार आहे.

"तसेच नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यासाठी बी टेक, एम टेक आणि डिप्लोमा करायची संधी देण्यासाठी आरआयटी मध्ये सुरु केलेल्या वर्किंग प्रोफेशनल अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. या व यासारख्या अनेक बदलांसोबत आरआयटी महाविद्यालयाचे एखाद्या मोठ्या विद्यापीठामध्ये लवकरच रूपांतर होण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या या प्रवासात माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नजीर शेख यांनी आरआयटीच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्व स्पष्ट केले आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या माजी विद्यार्थ्यांनी आरआयटीला येणाऱ्या पिढ्या घडविण्यासाठी मदत करावे असे आवाहन केले. माजी विद्यार्थी विभागाचे प्रमुख मंजूर मिर्झा यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले ज्या मध्ये त्यांनी सांगितले कि या ग्लोबल माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी १९८३ पासून आज अखेर २१ देशातून आणि भारतातील २० राज्यातून २५०६ माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी आजच्या मेळाव्याला मेळाव्याला सर्व डिग्री, डिप्लोमा, एमबीए, एमटेक, बीबीए आणि पीएचडी च्या १५७० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. तसेच महाविद्यालयाच्या ४१ वर्षाच्या कारकिर्दीत एवढ्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहभागी होण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले कि आजच्या ग्लोबल मेळाव्याची सुरवात हि सुद्धा १९८३ या पहिल्या बॅचच्या अमेरिका स्थित विद्यार्थ्यां च्या उपस्थिती पासून झाली हा एक चांगला योगायोग होता. या मेळाव्यासाठी अनेक देशातून माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. 

Web Title: Successful alumni will make educational institutions successful says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.