फासेपारधी समाजातीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:11+5:302021-01-03T04:13:11+5:30

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शिंदेवाडी(एकलहरे) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उपेक्षित फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न ...

Successful efforts to bring children from the dice society into the stream of education | फासेपारधी समाजातीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न

फासेपारधी समाजातीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न

Next

मंचर : आंबेगाव तालुक्यातील शिंदेवाडी(एकलहरे) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उपेक्षित फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. मंचर गावाच्या हद्दीवर राहणाऱ्या फासेपारधी वस्तीतील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी येथील शिक्षकांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे नऊ विद्यार्थी आता आनंदाने शिक्षण घेत आहे.

सेवाव्रती फुले दांपत्य सन्मान दिनी ही मुले शिंदेवाडी(एकलहरे) शाळेत दाखल झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनिषाताई कानडे या होत्या. मंचर गावाच्या हद्दीवर फासेपारधी समाजाची बारा ते तेरा घरे आहेत.यांची घरे मंचर हद्दीत असली तरी यांना लोंढेमळा (मंचर) व शिंदेवाडी(एकलहरे) शाळा शिक्षणाच्या दृष्टीने जवळ आहेत.

यावेळी बळवंत इंदोरे,संजय कराळे,संतोष थोरात,अंगणवाडी सेविका सुनिता गांजाळे,मदतनीस सुनिता थोरात हजर होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनिषाताई कानडे म्हणाल्या, “ शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे.यासाठी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम वेळोवेळी राबवली जाते.शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण व मार्गदर्शन सगळ्यांनाच मिळते,असे नाही.तेव्हा अशावेळी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तर निश्चीतच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश मिळते.पालक प्रतिनिधी प्रेम भोसले , सचिन रोडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक चांगदेव पडवळ,सूत्रसंचालन संतोष थोरात तर आभार संजय कराळे यांनी मानले. फोटोखालील मजकूर :

विकासवाडी (लोंढेमळा-मंचर) येथे सेवाव्रती फुले दांपत्य यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी दाखलपात्र विद्यार्थी व शिक्षकवृंद.

--

चौकट

गटशिक्षणाधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख गजानन पुरी व साहेबराव शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली लोंढेमळा शाळेतील आनंद गायकवाड, बळवंत इंदोरे, संजय कराळे व मंचर शाळेतील विनोद ढोबळे, संतोष राक्षे, दत्तात्रय बोऱ्हाडे या शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. त्यांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. वस्तीवर जाऊन पालक व मुलांची आस्थेने विचारपूस केली. पालकांना ६ ते १४ वयोगटातील किती बालके आहेत, याची माहिती शिक्षकांनी विचारली. यात आशिष फफ्फा काळे (वय ६), सुप्रिया फफ्फा काळे (वय ७), अक्षदा चोपड्या काळे (वय ७), खतिजा चोपड्या काळे (वय १०), विशाल रजीक भोसले(वय ७), साईराज ईदास काळे(वय ९), फरीदा विजय काळे(वय ६), अक्षरा रजिक भोसले(वय ६), राघवनी रजिक भोसले(वय ९) अशी मुले आढळून आली. ही मुले कधीच शाळेत गेली नसल्याची माहिती पालकांनी दिली. त्यानंतर मुख्याध्यापकबाळासाहेब कानडे व अभिजित नाटे यांच्या समुपदेशनानंतर पालकांनी मुलांना शाळेत पाठविले.

Web Title: Successful efforts to bring children from the dice society into the stream of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.