मुळशीत हळद उत्पादनाचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:09+5:302021-02-09T04:13:09+5:30
तुकाराम मरे यांनी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मित्राच्या मार्गदर्शनाने दहा किलो हळद लागवड केली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी ...
तुकाराम मरे यांनी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मित्राच्या मार्गदर्शनाने दहा किलो हळद लागवड केली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी दोन एकर क्षेत्रावर हळद लागवड केली त्यामध्येही त्यांना भरघोस उत्पादन मिळाले. त्यांनी स्वतः हळद प्रक्रिया (प्रोसिसिग) करून हळद पावडर तयार करून विक्री केली. लवासा सिटीमधे येणाऱ्या पर्यटकांना त्यांची विक्री करून त्यातून त्यांना तब्बल आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन एकर हळद उत्पादन करण्यास एक लाख नव्वद हजार इतका त्यांचा खर्च झाला. रासायनिक खते व औषधांचा वापर केला नाही त्यामुळे त्यामुळे हळद पूर्ण रसायन विरहित तयार झाली. त्याला ग्राहकांचीही पसंती मिळाली आणि सुमारे २५० रुपये किलो दराने हळगीचे विक्री झाली.
याशिवाय मरे हे त्यांच्या शेतातील तांदूळ, नाचणी, गावरान वाटाणा, कांदे भाजीपाला याची विक्री गावातच करतात पर्यायी स्वतः बाजारपेठ मिळविली तसेच याविभागात तुकाराम मरे यांनी सहकार्याच्या मदतीने "लवासा टेमघर शेतकरी महिला कंपनी " स्थापन करून १७५ बचत गटाच्या महिला एकत्र करून शेतकरी मालाची विक्री त्याच भागात करून महिला सबलीकरण करण्यास सहकार्य केले. हळद उत्पादन करणे व महिला कंपनी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी खाते मुळशी कार्यलयाचे तालुका कृषी अधिकारी हसरमणी झजे गवळी, कणकधर याचे व नवीन स्थापन झालेला मुळशी तालुका शेतकरी संघ यांचे मार्गदर्शन झाले .