विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:09 PM2020-01-21T14:09:40+5:302020-01-21T14:10:32+5:30

पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला यश हा तरुण कड्यावरुन खाली उतरण्याच्या नादात दरीत अशा ठिकाणी अडकला.

Successful rescue of youth trapped who stuck in valley | विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश  

विसापूर  किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश  

googlenewsNext
ठळक मुद्देशिवदुर्ग रेस्क्यू टिम व पाटण ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका

लोणावळा : विसापूर किल्याच्या कड्यावर दरीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र व पाटण ग्रामस्तांना यश आले. 
     पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला यश कासाट (वय 20, रा. पुणे) हा तरुण कड्यावरुन खाली उतरण्याच्या नादात दरीत अशा ठिकाणी आडकला की त्याला  खाली किंवा वर जाता येत नव्हते तो पुर्णपणे संकटात सापडला होता. यश हा त्यांच्या सात मित्रांसह शनिवारी विसापूर किल्लावर फिरण्यासाठी आला होता. किल्ला फिरून खाली येत असताना तो आपल्या मित्रांच्या पुढे चालत असताना वाट भरकटला व एका अवजड कड्यावर अडकून पडला होता. विसापूर किल्याच्या कड्यावर एक तरुण आडकला आहे असे पाटण येथील तरुणांना कळाल्यावर त्याच्या  मदतीसाठी पाटण येथील तरुणांची धावपळ सुरु झाली.  काही लोक कड्याच्या वरुन गेले, काही खाली थांबून त्याला आधार देत होते, संपूर्ण गाव, महिला, मुले रस्त्यावर येवून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती.  गावातील लोकांनी त्याला मदतीसाठी एक जाड जुड दोरखंड वरुन सोडला होता त्याने तो स्वतःच्या कमरेभोवती बांधून घेतला होता, यश हा कड्यावर किंवा कड्याखाली जायचा प्रयत्न करत होता पन दोन तीन तास अडकून बसल्यामुळे त्याची सर्व ताकद संपून गेली होती, हात पाय थरथरत होते, एक थोडीशी चूक त्याच्या जीवावर बेतणार होती.     गावातील लोकांनी त्याला संयम ठेवायला सांगत होते. दरम्यान ग्रामस्तांनी शिवदुर्ग मित्र ह्या लोणावळ्यातील रेस्क्यू टिमला विसापुर किल्ल्यावरील प्रकाराची कल्पना देत मदतीसाठी पाचारण केले.
   शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे  योगेश उंबरे, रोहित वर्तक, वैष्णवी भांगरे, अनिल सुतार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड व ग्रामस्त सागर कुंभार, सिध्देश तिकोणे, मयुर तिकोणे, ओंकार कोंडभर, मुकुंद तिकोणे, नितीन  तिकोणे, युवराज तिकोणे, रविंद्र तिकोणे,संभाजी तिकोणे, तुकाराम तिकोणे, विठ्ठल तिकोणे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शिवदुर्गचे योगेश उंबरे व रोहीत वर्तक हे हार्नेस घालून इतर साहित्यासह कड्यावरुन खाली उतरले तर बाकी टीमने रोप फ्रि करुन अँकरिंग करायला घेतली. दोरीच्या साह्याने योगेश खाली यशच्या जवळ गेला रोहीत त्याला बीले करत होता. योगेशने आडकलेल्या यशला हार्नेस घालून रोपमध्ये लॉक करून घेतले व त्याला सुखरुप खाली सोडले. गावातील कार्यकर्ते, तरुण खाली होतेच त्यांनी त्याला गावापर्यंत घेऊन आले. शिवदुर्ग मित्र व पाटण ग्रामस्तांच्या पराकाष्ठेमुळे विसापुर किल्ल्यावर आडकलेल्या तरुणांचे जीव वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. पर्यटकांनी विशेषतः तरुणांनी गड किल्ले तसेच डोंगर भागात माहिती नसलेल्या ठिकाणी धोकादायकरित्या जाऊन जीवाशी खेळू नये असे आवाहन शिवदुर्ग मित्र टिमच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Successful rescue of youth trapped who stuck in valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.