मशरूम लागवडीचे प्रशिक्षण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:10+5:302021-09-22T04:11:10+5:30
- तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यातील महिलांना रोजगाराच्या उद्देशाने मशरूम लागवडीचे प्रशिक्षण ...
-
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यातील महिलांना रोजगाराच्या उद्देशाने मशरूम लागवडीचे प्रशिक्षण येथील महाबॅंक आरसेटीकडून देण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराचा ३३ महिलांनी लाभ घेतला.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आंबेगाव येथील प्रभाग समन्वयक लता केंगले म्हणाल्या की, श्री क्षेत्र भीमाशंकर हे पर्यटनस्थळ असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक येत असतात. पर्यटकांची आवड लक्षात घेता ग्रामीण भागात पिकवलेल्या भाजीपाला पीक याला खूप मागणी असते त्याचाच एक भाग म्हणून महिलांनी मशरूम लागवड व्यवसायाचे प्रशिक्षण दिले.
१४ सप्टेंबरपासून दहादिवसीय प्रशिक्षण शिबिर सुरू झाले होते. त्यामध्ये जांभोरी, तळेघर, म्हतारबाचीवाडी, चिखली, राजापूर, फलोदे, तेरुंगण आदी परिसरातील ३३ महिलांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणासाठी तांत्रिक प्रशिक्षण म्हणून रमेश साबळे हे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणाच्या ठिकाणी तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले, तालुका अभियान व्यवस्थापक त्रिंबक पारासू प्रभाग समन्वय रमेश वकील, प्रियंका मोहुर्ले, लता केंगले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
--
फोटो क्रमांक : २१तळेघर महाबॅंक मशरुम लागवड
फोटो ओळी : तळेघर (ता. आंबेगाव) येथे महाबँक आरसेटीकडून आदिवासी भागातील महिलांना मशरूम लागवडीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे.