अशी पाखरे येती स्मृती ठेवूनी जाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:10+5:302021-01-25T04:12:10+5:30
: अशी पाखरे येती स्मृती ठेवूनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे तब्बल चाळीस वर्षांनतर शाळेच्या प्रांगणात उतरली. ...
: अशी पाखरे येती स्मृती ठेवूनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे तब्बल चाळीस वर्षांनतर शाळेच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते सन १९८१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. हा मेळावा श्री सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार येथे झाला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी सैनिक विलास खोकले व मंदा वाघोले यांनी विद्यार्थ्यांना संघटित केले. तब्बल चाळीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या आठवणींना उजाळा व नव्याने ओळख तसेच स्नेहभोजन, हास्यकल्लोळाचे वातावरणात सर्व रमून गेले. सामाजिक बांधीलकी जपत आपल्या ग्रुपमधील ज्या विद्यार्थ्यांचा आर्थिक विकास योग्य पद्धतीने झाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचा मानस व्यक्त केला. शाळा कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येक जण आपल्या करीअरकडे, वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या शाळेमुळे आपण लहानाचे मोठे झालो, विद्यार्थी-विद्यार्थिनीमध्ये मैत्रीचे नाते जोडले ती नाळ मात्र तशीच असते. यामधून स्नेह वृद्धिगंत व्हावा, हीच अपेक्षा विमल फुलसुंदर, शर्मिष्ठा नवले, मरयनबी मोमीन, शारदा महाकाल, मीनाक्षी वाघुले, दिलीप रोकडे, उत्तम नवले, वसंत शेटे यांनी व्यक्त केली.
या वेळी मंदा वाघोले यांनी प्रत्येकास भेटवस्तूचे वाटप केले, नंदिनी आवटे यांनी गुलाबपुष्प वाटप करून आभार व्यक्त केले. तर माजी विद्यार्थी शिवाजी शिंदे यांनी स्नेहभोजन आयोजित केले.
श्री सदगुरू सीताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढारचे विद्यार्थी ४0 वर्षांनंतर एकत्र