अशी हवी खिलाडूवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:42+5:302021-07-30T04:10:42+5:30

पत्रकारांनी इव्हानला विचारले की, "तू असे का केलेस? तुला संधी असताना तू पहिला क्रमांक का घालवलास?" इव्हानने सांगितले, "माझे ...

Such a playful attitude | अशी हवी खिलाडूवृत्ती

अशी हवी खिलाडूवृत्ती

Next

पत्रकारांनी इव्हानला विचारले की, "तू असे का केलेस? तुला संधी असताना तू पहिला क्रमांक का घालवलास?" इव्हानने सांगितले, "माझे स्वप्न आहे की, एक दिवस आम्ही अशी मानवजात बनू जी एकमेकांना मदत करेल. मी पहिला क्रमांक घालविला नाही."

रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलेस? " यावर इव्हान म्हणाला, "तो पहिला आलेलाच होता; ही रेस त्याचीच होती."

पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, "पण तू सुवर्णपदक जिंकू शकला असतास!" इव्हान म्हणाला, "त्या जिंकण्याला काय अर्थ होता? त्याने माझ्या मेडलला मान मिळाला नसता. माझी आई काय म्हणाली असती? संस्कार हे पिढी दरपिढी पुढेपुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते? दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईने मला दिली आहे."

मित्रहो, अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात येतात जेंव्हा आपल्यातील प्रामाणिकपणा आणि खिलाडूवृत्तीची परीक्षा असते ती परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्याशीच साधर्म्य असणारी आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविणारी घडना पुण्यातील ओंकार भागवत आणि कुणाल बडगुजर (एनसी रनर्स ग्रुप) यांच्याबाबतही घडली.

घटना भारतात पहिल्यांदाच झालेल्या गोवा येथील आयर्नमॅन आणि टाटा मुंबई मॅरेथॉनध्ये या धावपट्टूंनी प्रतिस्पर्धींना जखमी अवस्थेत मदत केली त्याचीही वृत्तांत पुढील अंकात याच सदरात प्रकाशित होईलच.

Web Title: Such a playful attitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.