अशी ही राजकीय घराणी... पवारांची तिसरी पिढी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:07 AM2019-03-25T01:07:42+5:302019-03-25T01:09:04+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या ५० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. आई-वडील शेतकरी कामगार पक्षाचे असले, तरी शरद पवार कायम कॉँग्रेस विचारांचे राहिले.

Such a political family ... Pawar's third generation | अशी ही राजकीय घराणी... पवारांची तिसरी पिढी

अशी ही राजकीय घराणी... पवारांची तिसरी पिढी

Next

- अविनाश थोरात

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या ५० वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. आई-वडील शेतकरी कामगार पक्षाचे असले, तरी शरद पवार कायम कॉँग्रेस विचारांचे राहिले. आमदार ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय पातळीवरही त्यांनी काम केले आहे. आजपर्यंत त्यांनी १४ सार्वत्रिक निवडणुका लढविल्या असून एकदाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला नाही. मात्र, कॉँग्रेसपक्षाच्या अध्यक्षपदासाठी १९९७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना सीताराम केसरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. वयाच्या २७व्या वर्षी ते मंत्री झाले. ३४व्या वर्षी मुख्यमंत्रिपद मिळविले. १९९९ मध्ये त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना केली.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सक्रिय राजकारणात १९९१ साली प्रवेश केला. पुणे जिल्हा सहकारी बॅँकेचे ते अध्यक्ष बनले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विजयी होऊन खासदार झाले. मात्र, तीन महिन्यांतच शरद पवार यांच्यासाठी लोकसभेची जागा रिकामी करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. ते विधानसभेवर गेले. १९९१ पासून आजपर्यंत ते विधानसभेत आमदार आहेत. या काळात राज्य मंत्रिपदापासून ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक पदे त्यांनी सांभाळली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे २००६ मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकली. शरद पवार यांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांनी बारामती कृषी प्रतिष्ठानची स्थापना केली. आप्पासाहेबांचे पुत्र राजेंद्र पवार सध्या त्याची धुरा सांभाळत आहेत. त्यांनाच राजकारणात शरद पवार यांचे वारसदार म्हणून आणले जाणार होते. परंतु काही कारणाने होऊ शकले नाही, असे म्हणतात, पण त्यांचे पुत्र रोहित पवार यांच्या रूपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात आली. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून राष्टÑवादी कॉँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. पार्थ यांना आई सुनेत्रा यांच्याकडूनही राजकीय वारसा आहे. त्यांचे मामा पद्मसिंह पाटील हे कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे मामेभाऊ आणि माजी मंत्री राणा जगजितसिंह यंदा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

Web Title: Such a political family ... Pawar's third generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.