अशी केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:50+5:302021-03-28T04:10:50+5:30

शिवाजीनगर येथील एटीएम सेंटरमध्येही त्याने याच कार्डचा वापर करुन ५ लाख रुपये काढले होते. तसाच प्रयत्न त्याने विमाननगर आणि ...

Such theft | अशी केली चोरी

अशी केली चोरी

Next

शिवाजीनगर येथील एटीएम सेंटरमध्येही त्याने याच कार्डचा वापर करुन ५ लाख रुपये काढले होते. तसाच प्रयत्न त्याने विमाननगर आणि धायरी येथील एटीएम सेंटरमध्ये करुन पाहिला होता. मात्र, या दोन सेंटरमधील मशीनमधून अशा प्रकारे ४० नोटा न येता ५०० रुपयांच्या २च नोटा बाहेर आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पुढे फसवणुकीचा प्रयत्न केला नाही.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ शिंदे यांनी सांगितले की, या दोघा चोरट्यांनी तोंड झाकले असल्याने त्यांचे चेहरे ओळखू येत नाही. त्यांनी एटीएम मशीनच्या पाठीमागील बाजूला काही तरी वस्तू लावली होती. तसेच ते मोबाईलवरुन मशीन ऑपरेट करताना दिसून येत आहे.

एटीएम मशीन बंद करुन पैसे काढण्याचा एक प्रकार यापूर्वी चोरट्यांकडून वापरला जात होता. आता चक्क एटीएम मशीन हॅक केल्याचा प्रकार समोर येत आहे. त्याचा तपास करायचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून बँकांनाही आपल्या तांत्रिक बाजू आणखी भक्कम कराव्या लागणार आहेत.

Web Title: Such theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.