सणसवाडीत कंपनीला अचानक भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:22 AM2021-02-21T04:22:49+5:302021-02-21T04:22:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल अँड टी फाटा येथे असणाऱ्या सिंटेक्स बीएपीएल ...

Sudden fierce fire at the company in Sanaswadi | सणसवाडीत कंपनीला अचानक भीषण आग

सणसवाडीत कंपनीला अचानक भीषण आग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल अँड टी फाटा येथे असणाऱ्या सिंटेक्स बीएपीएल

कंपनीमध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक आग

लागली. आग मोठी असल्याने तब्बल साडेतीन तासांच्या

प्रयत्नानंतर सात अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग

आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कोट्यवधी

रुपयांचे नुकसान यावेळी झाले आहे.

सणसवाडी येथील एल अँड टी

फाट्याजवळ असणाऱ्या सिंटेक्स बीएपीएल

कंपनीमध्ये सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या

सुमारास अचानक आग लागली. यावेळी आगीचे लोळ खूप लांब व जास्त अंतरावर पसरले गेले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर,

पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पुणे

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित

दरेकर, सणसवाडी ग्रामपंचायत सदस्य विजयराज दरेकर, सागर दरेकर यांसह

आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनीला आग

लागल्यानंतर शेजारी असलेल्या एलिकॉन कास्टलाय कंपनीतील कामगारांनी त्यांच्या

कंपनीतील अग्निशामक साहित्याने आग

विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच कंपनीतील एचआर सूरज सोनवणे,

सुरक्षा अधिकारी सागर गोरे, भूपेंद्र

सोनवणे, सचिन रुके, जितेंद्र हिंगे, अजितभुजबळ, विशाल परांडे, योगेश कोतकर,

बाबूराव भोसुरे, योगेश पाटील यांसह आदी

कामगारांनी देखील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तरीही

आगीने संपूर्ण कंपनीमध्ये वेढा घेतला. आगीने

मोठा पेट घेतल्याने कंपनीतील मशिनरी व आदी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान पुणे

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रांजणगाव एमआयडीसी, पुणे महानगर पालिका, शिरूर नगर परिषद या ठिकाणच्या तब्बल नऊ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. साडेतीन ते चार तासांनी आग विझविण्यात यश आले. या घटनेत कोट्यवधींचे नुकसान झाले.

शिरूरच्या तहसीलदार लैला

शेख, मंडलाधिकारी उद्धव फुंदे, कामगार

नेते राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक

अध्यक्ष यशवंत भोसले, यांनी कंपनीला भेट

देऊन कंपनीच्या आगीची पाहणी केली असून

कंपनीला आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकली

नाही.

फोटो : सणसवाडी ता. शिरूर येथे कंपनीला

लागलेली भीषण आग.

Web Title: Sudden fierce fire at the company in Sanaswadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.