प्रवासी डब्याला अचानक आग; रेल्वे प्रशासनासह प्रवाशांची धांदल, दौंड रेल्वे स्थानकावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 06:51 PM2023-07-17T18:51:07+5:302023-07-17T18:51:25+5:30

दौंड नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने आल्यामुळे पुढील अनर्थ टळला

Sudden fire in a passenger compartment Railway administration with passenger manipulation, incident at the station | प्रवासी डब्याला अचानक आग; रेल्वे प्रशासनासह प्रवाशांची धांदल, दौंड रेल्वे स्थानकावरील घटना

प्रवासी डब्याला अचानक आग; रेल्वे प्रशासनासह प्रवाशांची धांदल, दौंड रेल्वे स्थानकावरील घटना

googlenewsNext

दौंड : दौंडरेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक सहाच्या बाजूस अडगळीत उभ्या असलेल्या एका प्रवासी गाडीच्या रॅकच्या डब्याला अचानक आग लागली. त्यामुळे रेल्वे प्रशासनासह प्रवाशांची धांदल उडाली. दरम्यान या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. आग कशाने लागली याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक डब्यातून धुराचे लोळ निघत असल्यानचे रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आग विझविण्यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस, आरपीएफ यांच्यासह प्रवाशांनी धाव घेतली. यावेळी दौंड नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. परिणामी आग विझविण्यात आली. गेल्या काही वर्षापासून हा रेल्वेचा प्रवासी डब्यांचा रॅक उभा आहे. यापूर्वी देखील याच रॅक मधील एका डब्याला आग लागली होती. आणि पुन्हा आता याच रॅकच्या डब्याला आग लागल्याने रेल्वे प्रशासनाचा ढिसाळपणा समोर आला आहे. जर हा रॅक वेळीच हलवला असता तर आज डब्याला आग लागण्याची घटना घडली नसती. पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे कामकाज सुरू आहे.

Web Title: Sudden fire in a passenger compartment Railway administration with passenger manipulation, incident at the station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.