मूलबाळ होत नाही म्हणून छळ, विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:07 AM2019-02-19T02:07:47+5:302019-02-19T02:08:07+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ज्योती हिचा दिलीप म्हस्के याच्याशी विवाह झाला होता;
पुणे : मूलबाळ होत नाही, तसेच गाडी, जागेसाठी माहेरहून पैसे आणण्यावरून होणाऱ्या शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पतीला अटक केली असून सासू, सासरा, दीर, नणंद, अशा एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती दिलीप म्हस्के (वय २५, रा़ बालेवाडी) असे आत्महत्या करणाºया विवाहितेचे नाव आहे, तर दिलीप नाथा म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. सासू रामकोर नाथा म्हस्के, सासरे नाथा किसन म्हस्के, दीर मारुती नाथा म्हस्के, नणंद रंजना राजू मानकर, अंजना मधुकर खरात, सुनीता विजय बनसोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर याप्रकरणी ज्योतीचा भाऊ संतोष दादाराव आनंदराव (वय २८, रा़ शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ज्योती हिचा दिलीप म्हस्के याच्याशी विवाह झाला होता; परंतु लग्नाला दोन वर्षे उलटूनही मूलबाळ होत नसल्याने तिला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता, तसेच तिला गाडी, जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून ज्योती हिने बालेवाडी येथील घरी गळफास घेऊन २४ जानेवारी रोजी आत्महत्या केली.