उपपदार्थ निर्मितीमुळे साखर उद्योगाला उभारी : आमदार संग्राम थोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:48+5:302021-01-25T04:11:48+5:30
नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर ...
नसरापूर : साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीस साखर उद्योगाला नक्कीच चांगले दिवस येतील. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून साखर उद्योगात होत नेहमी होत असलेल्या बदलांचा स्वीकार करायला हवा. उसाच्या बाजारभाव स्पर्धेत टिकायचे असेल तंत्रज्ञानाच्या वापराने उपपदार्थांची निर्मिती करायला हवी यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्त्वाची आहे, असे राजगड' कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांनी मत व्यक्त केले.
भोर तालुक्यातील अनंतनगर-निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन संस्थापक, संचालक व माजी मंत्री अनंतराव थोपटे व कारखान्याचे अध्यक्ष आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष विकास कोंडे, मुंबई बाजार समितीचे उपाध्याक्ष धनंजय वाडकर, संचालक किसनराव सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, पोपटराव सुके, राजेश काळे, शंकरराव धाडवे पाटील, शोभा जाधव, संभाजी मांगडे, विट्ठल कुंडले तसेच उत्तम थोपटे, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र कोंडे, संदीप नगीने, सोमनाथ वचकल, ज्ञानेश्वर कोंडे, कार्यकारी संचालक सुनीता महिंद, अंकुश इंगुळकर, राजेंद्र राजेशिर्के आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकारने इथेनॉल बाबत घेतलेले निर्णय व इथेनॉलला मिळणारा दर लक्षात घेवून राजगड सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करण्याचे ठरविले आहे. इथेनॉलचे एक कोटी लिटर उत्पादन करण्यासाठी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल तयार करून इथेनॉल निर्मिती करीत भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तेल कंपन्यांशी करार केला आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार इथेनॉलचा पुरवठा केला जाणार आहे. उपपदार्थ प्रकल्पातून आणि साखर उत्पादनातून ऊस उत्पादकांना योग्य दर देऊन सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे यावेळी आ. थोपटे यांनी सांगितले.
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या ३० व्या गळीत हंगामात ४८ दिवसांत ६५ हजार ७७५ मेट्रिक टन ऊस गाळप झाले, साखर उत्पादन ५६ हजार २०० पोती झाले तर साखर उतारा सरासरी ८.७७टक्के आहे. गळीत हंगाम एप्रिल महिना अखेरपर्यंत २ लाख ५० हजार मेट्रिक टन उद्दिष्ट आहे, असे आ. थोपटे यांनी सांगितले.
आज अखेर ४८ दिवसांमध्ये ६५हजार७७५ मे. टन ऊसाचे गाळप करून ५६२०० साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. सरासरी साखर उतारा ८.७७ टक्के आलेला आहे. कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास पहिल्या हप्त्याचे पेमेंट लवकरच दिला जाईल. कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ साठी अडीचलाख मे. टनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक व पुरवठारधारक यांनी आपला नोंदलेला सर्व ऊस राजगड साखर कारखान्यास देवून सहकार्य करावे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनील महिंद यांनी दिली.
"राजगड कारखाना डिस्टिलरी प्रकल्प यासह १८ मेगावॅट सहवीजनिर्मिती करणार आहे.
आ. संग्राम थोपटे, अध्यक्ष, राजगड सह. साखर कारखाना
राजगड इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करताना माजी मंत्री अनंतराव थोपटे,आमदार संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.