साखर उता-यात सोमेश्वर कारखान्याने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 02:21 AM2018-01-03T02:21:22+5:302018-01-03T02:22:49+5:30
साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून, ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तर ११.२४ चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात बाजी मारली आहे.
सोमेश्वरनगर - साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १५ कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून, ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे, तर ११.२४ चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताºयात बाजी मारली आहे.
गेल्या वर्षी, याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत त्याच ठिकाणी तंबू ठोकले होते, तर ऊसउत्पादकांना जादा पैशांचे आमिष दाखवून ऊस मिळविण्यासाठी संचालक मंडळ व शेतकी विभाग रात्रंदिवस धडपडत आहे.
राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत. त्यामुळे ऊस तुटून गेल्यानंतर गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत.
दरम्यान, कारखाने सुरू झाल्यापासून संचालक मंडळ शेतकी विभागांना हाताशी धरून मिटिंगवर मिटिंग घेत असून, रोजची रणनीती आखत आहे. कारखाना सध्या सभासदांचा ऊस मागे ठेवत आहे. बाहेरील गेटकेन ऊस कसा आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त मिळवता येईल, याकडे कारखान्याचे लक्ष लागले आहे. उसाचे अपुरे क्षेत्र आणि साखरेला असलेला चांगला भाव, याकडे जादा गाळप करण्यासाठी कारखाने धडपडत होते.
अनेक साखर कारखान्यांचे आडसाली उसाचेच गाळप सुरू असून, सभासदांचे ऊस अद्यापही शेतातच उभे आहेत. त्यामुळे टनेज घटून ऊसउत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. आडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना उजाडेल, त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना एप्रिल महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे हंगाम सुरू होताना साखरेला चांगले दर होते. मात्र, आता साखरेचे दर पडल्यामुळे बँकांनी साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
चालू हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने उसाचा गोडवा वाढला होता. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले आहेत. मात्र, या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना साखर उतारा मिळत नाही.
सर्व कारखान्यांनी मिळून ३९ लाख ६३ हजार ८२६ मे. टन उसाचे गाळप करून ४१ लाख ११ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बारामती अॅग्रो कारखान्याने ४ लाख ७० हजार ९१० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख ९४ हजार ५० क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दौंड शुगर कारखान्याने ३ लाख ८३ हजार ४२५ मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख १९ हजार १५० पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला. तर ३ लाख ५९ हजार २६० मे. टन उसाचे गाळप करून ४ लाख १ हजार २०० पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर तिसºया क्रमांकावर आहे.
साखर उतारा :
सोमेश्वर कारखाना : ११.२४
भीमाशंकर कारखाना : ११.१२
विघ्नहर कारखाना : ११.०६