साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी विषय डोक्यावरून जाणारे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:11 PM2019-12-25T15:11:42+5:302019-12-25T15:14:34+5:30

पुण्याजवळील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.  ऊसभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

Sugar technology, sugar engineering are hard subject to understand : Uddhav Thackeray | साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी विषय डोक्यावरून जाणारे 

साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी विषय डोक्यावरून जाणारे 

googlenewsNext

पुणे : ऊसापासून साखर निघते एवढेच माहिती होते, मात्र साखर तंत्रज्ञान, साखर अभियांत्रिकी ही सगळे विषय माझ्या डोक्यावरून जाणारे आहेत. साखरेमागे एवढे मोठे काम असेल याची कल्पना नव्हती असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले. त्यामुळे बोलताना काही चुकले तर वडिलांचे मित्र जबाबदार असतील असे ते शरद पवार यांच्याकडे बघून म्हणाले.

पुण्याजवळील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.  ऊसभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील,  दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. 

पुढे ठाकरे म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. साखरेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी देशाला दिशादर्शक ठरेल असे धोरण ठरवणार आहोत. दोन लाख रुपयांची जशी कर्जमाफी केली त्याप्रमाणे त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकरिता नवी योजना विचाराधीन आहे, नियमित थकबाकीदार नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नवी योजना आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मी राष्ट्रवादीतच : मोहिते पाटलांचा यु टर्न 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती झाली होती. त्यावेळी विजयसिंह मोहितेपाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राज्यात मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र त्यांनी आज ' मी राष्ट्रवादीत' च असल्याचा मोठा गौप्यस्फोट करत एकप्रकारे भाजपला 'दे धक्का' दिला आहे. प्रचारादरम्यान उघड उघड जरी भाजपचा प्रचार केला नसला तरी मुलाच्या विजयासाठी आतून बरेच सूत्रे हलवल्याची चर्चा आहे. मात्र आता त्यांनी भाजपला दे धक्का देत मोठे विधान केले आहे. भाजपकडून याला कसे प्रत्युत्तर मिळते ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Sugar technology, sugar engineering are hard subject to understand : Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.