Sugarcane Factory : भीमाशंकरला सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:31 IST2025-01-21T20:30:23+5:302025-01-21T20:31:32+5:30
६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट

Sugarcane Factory : भीमाशंकरला सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार
अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार””जाहीर झाला आहे.
कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर, कृषी कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण, कृषी निविष्ठांचा मोठया प्रमाणावर पुरवठा, पाचट कुट्टी करणेसाठी विशेष प्रयत्न, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील ६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे.