जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:09 PM2019-10-19T12:09:34+5:302019-10-19T12:16:46+5:30

जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

sugarcane plantation work superfast due to rains | जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती : रब्बी पिकांपेक्षा ऊस लागवडच अधिकराज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेगया काळात देशात देखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक

पुणे : चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ऊस लागवडीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात २३ हजार ७३० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. रब्बी हंगामातील तृण व अन्नधान्यांपेक्षा ६ हजार हेक्टरने ऊस क्षेत्र जास्त आहे. 
जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पर्जन्य छायेतील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे. राज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या काळात देशामधेदेखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने दिलेली ओढ, दुष्काळजन्य स्थितीमुळे चारा म्हणून उसाचा झालेला वापर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या ऊस पट्ट्यामध्ये आॅगस्ट महिन्यात आलेला पूर यामुळे २०१९-२० हा अगामी गाळप हंगाम अडचणीत आला आहे. राज्यातील साखर उत्पादन ६० लाख टनापर्यंत खाली घसरेल, असा अंदाज आहे.  जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने नीरा धरणातून सोडलेले पाणी, मुठा उजवा कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे दौंड-इंदापूर भागातील भरलेले पाझर तलाव या मुळे शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेग आला आहे. शिरूरमध्ये सर्वाधिक ६,७७५, दौंडमधे ६,०६६ व बारामती तालुक्यात ३,५३८ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा ८९ टक्के पाऊस झालेल्या इंदापूर तालुक्यातही १ हजार ५९६ हेक्टरवर ऊस लागण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली. 
,.........

जिल्ह्यातील ऊस लागवडीची स्थिती
तालुका                सरासरी                लागवड 
    क्षेत्र              झालेले क्षेत्र
हवेली                   ९५९५                    १४२६
मुळशी               १८२१                      ८३१
भोर                    १४२५                       ६४५
मावळ              १५६६                           ०
वेल्हे                 २११.७                         ०
जुन्नर               ९६५३                      २४५
खेड                   २९२८                        ०
आंबेगाव           ३८२७                       ३९८
शिरूर             १८,५६९                   ६,७७५
बारामती      १६,११७                     ३५३८
इंदापूर         ३१,२०१                     १५९६
दौंड              ३१,२६१                    ६,०६६
पुरंदर         २४५६                        २२०२
एकूण          १,३०,६३१               २३,७३०
.....................
* जिल्ह्यात रब्बी पिकाचे ऊसासह ५ लाख २२ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र असून, पैकी ४१ हजार १५८ हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे झाली आहेत. 

* ऊस पिक वगळून रब्बीचे क्षेत्र ३ लाख ९१ हजार ८९७ हेक्टर असून, १७ हजार ४२८ हेक्टरवर (४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे. 

* उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३० हजार ६३१ हेक्टर असून, २३,७३० (१८ टक्के) हेक्टरवर लागवड झाली आहे. 

Web Title: sugarcane plantation work superfast due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.