दूधसंकलक धास्तावला, अमूलचे संकलन कमी करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:54 AM2018-06-12T02:54:40+5:302018-06-12T02:54:40+5:30

उत्तर पुणे जिल्ह्यात दूधउत्पादकांकडे पायघड्या घालत अमूलने दूध संकलन केंद्र सुरू केले; मात्र अलीकडे दुधाची प्रत कमी दर्जाची असल्याचे सांगत अचानक संकलन कमी करण्याच्या सूचना केंद्रांना देण्यात येत आहेत.

 Suggestions for reducing the compilation of milk | दूधसंकलक धास्तावला, अमूलचे संकलन कमी करण्याच्या सूचना

दूधसंकलक धास्तावला, अमूलचे संकलन कमी करण्याच्या सूचना

Next

टाकळी हाजी : उत्तर पुणे जिल्ह्यात दूधउत्पादकांकडे पायघड्या घालत अमूलने दूध संकलन केंद्र सुरू केले; मात्र अलीकडे दुधाची प्रत कमी दर्जाची असल्याचे सांगत अचानक संकलन कमी करण्याच्या सूचना केंद्रांना देण्यात येत आहेत. त्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकारी दूध संस्थांनी शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव न दिल्यास अमूलसारख्या संस्थेला दूध संकलनाची परवानगी देऊ, असा इशारा दिल्याने दूधसंकलक धास्तावले आहेत. त्यांना परवानगी मिळाली तर हुकूमशाही सुरू होईल, अशी भीती ते व्यक्त करीत आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात अमूल संकलन केंद्राच्या चालकांना हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे दर कमी झाल्याने दुधाचे भाव गडगडले आहेत. उत्पादन खर्च भागेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये सरकारविरोधात असंतोष वाढला असून, रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाव कमी मिळण्याचा दोष शासनाच्या धोरणाऐवजी संस्थावर देऊन मोकळे झाले; तसेच गुजरातच्या एका नामांकित संस्थेला दूध संस्थांची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा इशारा त्यांनी दिला.
याच दोन वर्षांपूर्वी दूध देण्यासाठी शेतकºयांपुढे पायघड्या घातल्या. गावागावांत दुधाचे केंद सुरू केले; मात्र बाजारभाव कमी होताच संस्थाचालकांना दूध कमी करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. अनेकांचे दूध विविध कारणे देत नाकारले. ज्या तरुणांनी मोठ्या आशेने कर्ज घेऊन संकलन केंद्र सुरू केले, त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. ज्यांनी कंपनीविरोधात आवाज उठविला त्यांचे संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. प्रत खराब असल्याची कारणे पुढे केली; मात्र हे सगळे भाव पडल्यावरच का? असा प्रश्न संकलन करणारे विचारत आहेत.

सहकारी संस्थांच्या जागा अमूलला नाही : जानकर
सहकारी दूध संस्थांच्या जागा भाडेतत्त्वावर अमूलला देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. सहकारी चळवळ मोडीत न काढता वाढविण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी दूध संस्थांच्या जागा कुणालाच देणार नाही, असे राज्याचे पशुसंर्वधन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दूध कमी असताना ३.२ फॅट, व ८.२ स्निग्धांश असलेले दूध स्वीकारत होते; मात्र दूध उत्पादन वाढून, भाव कमी होताच त्यांनी ३.२ फॅटवरून ३.५ फॅट व ८. २ स्निग्धांशवरून ८. ५ वर वाढवून शेतकºयांची अडवणूक सुरू केली आहे. या शिवाय या कंपनीचे खाद्यही शेतकºयाने घेणे बंधनकारक आहे. ते इतर कंपन्यांपेक्षा महाग आहे.
सध्या अमूल दोन रुपये जादा दर देण्याचा आव आणत असली, तरी शेतकºयांकडून दुधाची प्रत ही त्याच पद्धतीने घेत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात हिरवा चारा मुबलक असल्यामुळे फॅट व स्निग्धांश लावण्यासाठी शेतकºयांना वाकलेला चारा चढ्या दराने विकत घ्यावा लागतो. त्यातही नुकसान होते.

Web Title:  Suggestions for reducing the compilation of milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.