सुग्रास, महाअॅग्रोचे अधिकृत वितरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:13+5:302021-03-13T04:17:13+5:30
बारामती: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सुग्रास व महाअॅग्रो पशुखाद्य विक्रीकरिता अधिकृत वितरक म्हणून बारामतीच्या विद्यानंद अॅग्रो ...
बारामती: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सुग्रास व महाअॅग्रो पशुखाद्य विक्रीकरिता अधिकृत वितरक म्हणून बारामतीच्या विद्यानंद अॅग्रो फिडस्ला मान्यता मिळाली आहे. यानिमित्त थेट कंपनी ते शेतकरी माफक दरात उत्पादने पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक उभारून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्यात येणार असल्याचे विद्यानंद इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रिती निंबाळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे. या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना माफक दरात कीटकनाशके, खते, पशुखाद्य व कृषि अवजारे उपलब्ध करून दिली जातात. बारामती येथील विद्यानंद अॅग्रो फिडस्ची राज्यशासनाच्या सुग्रास व महाअॅग्रो या पशुखाद्याच्या अधिकृत वितरक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परंपरागत पशुसंवर्धन पध्दतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे संकरित प्रजाती विकसित करणे, पशूंच्या गोठ्यांसाठी व पक्ष्यांच्या घरट्यांसाठी वास्तुशास्त्राचा अवलंब करणे, खाद्य व खाऊ घालण्याच्या पध्दती, औषधोपचार, आरोग्य, दुग्धोत्पादन आणि अंतत: विविध उत्पादनांचे मूल्यवर्धन व वापर सुसंगता या करिता प्रमाण तयार करणे, आदी बाबींवर खास करून लक्ष देण्यात येणार आहे. शेतकºयांना संकरीत जनावरांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता बाळगण्यासाठी विद्यानंद अॅग्रो फिडस्च्या माध्यमातून वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात येणार असून, या माध्यमातून कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, आरोग्य शिबिरे देखील राबवण्यात येणार आहेत.
--------------------
सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासकीय कंपनीची उत्पादने माफक दरात पोहोचवण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून जनावरांच्या आरोग्यासह दुग्ध उत्पादन वाढीवर खास करून काम करण्यात येणार आहे.
- आनंद लोखंडे
चेअरमन, विद्यानंद अॅग्रो फिड्स