पुण्यात ५ मेपासून ‘सुहासिनी’ शिबिर
By admin | Published: April 15, 2015 01:55 AM2015-04-15T01:55:22+5:302015-04-15T01:55:22+5:30
महिला व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ व निरंतर प्रशिक्षण योजना, पुणे यांच्या वतीने ५ मेपासून ‘सुहासिनी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद : महिला व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ व निरंतर प्रशिक्षण योजना, पुणे यांच्या वतीने ५ मेपासून ‘सुहासिनी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे निवासी शिबिर ३० मेपर्यंत चालणार असून, ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या उपक्रमात देशभरातून ६० प्रशिक्षणार्र्थींची निवड करण्यात येणार आहे.
पुणे येथे आयोजित या शिबिरात सेल्फ एम्पॉवरमेंट, मंच संचालन, सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास, इनोव्हेटीव्ह कुकिंग, झुंबा फिटनेस, हास्य योगा याबाबत इंग्रजी व हिंदी भाषेतून प्रशिक्षण दिले जाते.
हा उपक्रम गेल्या २६ वर्षांपासून राबविला जात असून, यातील प्रथमोपचार प्रमाणपत्र प्रशिक्षण शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्य विषयांसोबतच रांगोळी, कॉफी पेंटिंग, गिफ्ट पॅकिंग, डेको पॅच आदी विषयांतही ‘सुहासिनी’ महत्त्वपूर्ण ठरत आले आहे.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणारे १६ ते २५ वर्षे वयोगटातील, पदवीधर किंवा त्यांनी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली असावी. यात माहेश्वरी समाजासोबतच अन्य समाजातील युवती-महिलांना सहभागी होता येईल. सहभागासाठी दूरध्वनी क्र. ०२०-२५६७१०९० / ९१ व ९३२६३५५९५० वर किंवा ल्ल्र१ंल्ल३ं१@े५स्रे.ङ्म१ॅ / ंे्रिल्ल@े५स्रे या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा अथवा ६६६.े५स्रे.ङ्म१ॅ हे संकेतस्थळ पाहावे. (प्रतिनिधी)