आयुक्तालयासमोर महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:00 AM2018-12-29T02:00:10+5:302018-12-29T02:00:19+5:30
पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखल्याने अनर्थ टळला.
पुणे : पोलीस आयुक्तालयासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेवर बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीर दारूविक्रीबाबत पोलिसांना माहिती दिल्याने या महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. संबंधित महिला सिंहगड रस्ता येथील तुकाईनगरमध्ये राहते. त्या राहत असलेल्या ठिकाणी काही महिलांकडून बेकायदेशीर दारूविक्री केली जात असल्याची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संंबंधित ठिकाणी छापा टाकला होता. त्यामुळे दारू विक्री करणाºया महिलांकडून संबंधित महिलेला मारण्याची धमकी देण्यात आली होती. या त्रासाला तसेच
येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी त्या पोलीस आयुक्तालयात गेल्या होत्या. मात्र त्यांनी तक्रार न देता आत्महदनाचा प्रयत्न केला.