Pune: प्रेयसी आणि प्रियकराचा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न; प्रेयसीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:18 PM2021-12-22T13:18:51+5:302021-12-22T13:25:39+5:30
शेलपिंपळगाव : मोहितेवाडी (ता. खेड ) येथे एका शेतात झाडाला गळफास घेऊन प्रेयसी आणि प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...
शेलपिंपळगाव : मोहितेवाडी (ता. खेड) येथे एका शेतात झाडाला गळफास घेऊन प्रेयसी आणि प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला; तर प्रियकर बेशुद्धावस्थेत खाली पडलेला आढळला. त्याच्यावर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा दिनकर सोनवणे (वय २२, रा. जांभोळशी, पो. मांढवे, ता. जुन्नर) हिचा मृत्यू झाला, तर तिचा प्रियकर हरिदास कुंडलिक देवचे (वय २८, रा. जांभोळशी) असे उपचार घेत असलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि.२०) घडली. सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुषमा ही शिक्रापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती, तर हरिदास हा चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत खासगी नोकरीस होता. आत्महत्येच्या प्रयत्नात सुषमा हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर हरिदास हा बेशुद्धावस्थेत होता. दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला होता.
आत्महत्येच्या प्रयत्नात प्रियकराचा मृत्यू झाला आहे. सध्या प्रियकर हरिदासवर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे