प्रियकराच्या घरी घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 03:25 AM2019-03-02T03:25:33+5:302019-03-02T03:25:47+5:30

फसवणुकीमुळे नैराश्य : साथीदाराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय

suicide at boyfriends home | प्रियकराच्या घरी घेतला गळफास

प्रियकराच्या घरी घेतला गळफास

Next

पुणे : तिच्या साथीदाराने दुस-या तरुणीशी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. यातून झालेल्या फसवणूक आणि आलेल्या नैराश्यातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तरुणी संगणक अभियंता होती. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता असलेल्या तरुणास अटक केली.


श्वेता अरुण बिश्वास (वय ३०, रा. निर्मला निवास, दस्तुर रोड, कॅम्प) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सचिन बबन कासिद (वय २९, रा. स्वप्नलोक सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल बिश्वास (वय २२, रा. बीड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.


श्वेता ही फिर्यादी यांची बहिण आहे. ती नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तिचा मित्र सचिन कासीद हाही खराडी येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. श्वेता व सचिन हे दोघेही मागील काही वर्षांपासून सचिनच्या फुरसुंगी येथील घरी लिव इन रिलेशनशीप मध्ये रहात होते.

अभियंता तरुणास पोलिसांनी केली अटक
रविवारी सचिन हा बार्शीमधील त्याच्या मुळ गावी गेला होता. त्यावेळी त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तिकडे एक मुलगी पाहिली.
सचिनला ती मुलगी आवडल्याने त्याने तिच्यासमवेत लग्न करण्याचे ठरविले होते. ही बाब श्वेताला कळल्याने श्वेता व सचिनचे वाद झाले होते.
या सर्व प्रकारामुळे श्वेता नैराश्येत गेली होती. बुधवारी तिने सचिनच्या फुरसुंगी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.लोंढे करत आहेत.

Web Title: suicide at boyfriends home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.