धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:23 PM2022-02-08T20:23:07+5:302022-02-08T20:23:18+5:30

इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी म्हणून 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते

Suicide by hanging of a prisoner in Yerawada Jail in Pune | धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. समाधान कांतीलाल सावंत (वय 26, रा. कोळेगाव, माळशिरस, सोलापूर) यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी समाधान सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीन बंदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास समाधान याने टॉवेलच्या साहाय्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाचे गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारागृह विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणी पूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. कारागृह विभागाच्या नियमानुसार ससून रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 घटनास्थळी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, कारागृह विभागाच्या अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करीत आहेत.

Web Title: Suicide by hanging of a prisoner in Yerawada Jail in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.