पत्नी, मुलीची हत्या करून आत्महत्या

By admin | Published: June 26, 2017 03:42 AM2017-06-26T03:42:49+5:302017-06-26T03:42:49+5:30

पत्नी आणि मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २५) पहाटे येथील क्रांतीनगर, ओळकाईवाडी येथे घडली.

Suicide by killing wife, daughter | पत्नी, मुलीची हत्या करून आत्महत्या

पत्नी, मुलीची हत्या करून आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : पत्नी आणि मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २५) पहाटे येथील क्रांतीनगर, ओळकाईवाडी येथे घडली.
बबन जयवंत धिंदळे (वय ३८), दीपाली (वय ३०) आणि मुलगी दीप्ती (वय ११) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. बबन धिंदळे यांनी मुलगा रोहित (वय ९) याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो बचावला असून, त्याच्यावर लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी दीपाली हिचे प्रेमप्रकरण उघड झाल्याने चिडून जाऊन बबन याने कुटुंबातील सर्वांना संपविण्याचा प्रयत्न करून आत्महत्या केली असल्याचे वास्तव समोर आले आहे.
बबन हा पेंटिंगचा व्यावसाय करत असे. काही दिवसांपूर्वी त्याला पत्नीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने रविवारी सकाळी पावणेआठ वाजण्यापूर्वी पत्नी दीपाली आणि दोन्ही मुलांचा दोरीने गळा आवळला. तिघेही मृत्यू पावल्याचे समजून बबनने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली.

Web Title: Suicide by killing wife, daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.