चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:29+5:302021-06-03T04:08:29+5:30

उषा योगेश गायकवाड (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश तानाजी गायकवाड (वय ३३, रा. पिराजीनगर, माळवाडी, ...

Suicide by strangling husband by murdering wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Next

उषा योगेश गायकवाड (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश तानाजी गायकवाड (वय ३३, रा. पिराजीनगर, माळवाडी, वडगाव शेरी) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे. ही घटना ३१ मे रोजी रात्री साडेदहा ते १ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

योगेश गायकवाड हा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून काही कामधंदा करीत नव्हता. उषा ही स्वयंपाकाची कामे करीत होती. त्यांना एक १० वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून योगेश हा उषा हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. पिराजीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ते राहत होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता ते तिघेही जण टीव्ही पाहत होते. त्यावेळी योगेश याने मुलीला तू जाऊन झोप, असे सांगितले. त्यानुसार मुलगी शेजारच्या खोलीत जाऊन झोपली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास योगेश याने उषा हिचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता मुलगी उठली व तिने दरवाजा उघडल्यावर तिला हे दृश्य दिसले. हा प्रकार या लहान मुलीने आपल्या चुलत्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक निरीक्षक अण्णासाहेब टापरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

उषा गायकवाड हिचे शवविच्छेदन करण्यात आले. गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याने आता त्यांची १० वर्षांची मुलगी अनाथ झाली आहे.

Web Title: Suicide by strangling husband by murdering wife on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.