शिरूर तालुक्यात ऊसतोड मजूराची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:52 PM2021-11-02T17:52:41+5:302021-11-02T17:53:00+5:30

दरम्यान काही दिवसापूर्वीच न्हावरे पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याच्या घटनेची नोंद झाली होती

suicide by strangulation of sugarcane workers in shirur taluka | शिरूर तालुक्यात ऊसतोड मजूराची गळफास घेऊन आत्महत्या

शिरूर तालुक्यात ऊसतोड मजूराची गळफास घेऊन आत्महत्या

Next

न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे ऊसतोड मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद न्हावरे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेत सुभाष सदाशिव गायकवाड ( वय-  ३५ रा.मू.पो.गौखेल ता.आष्टी.जि.बीड) यांचा मृत्यू झाला आहे. 
    
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नोव्हेंबरला न्हावरे येथील शाळेच्या पाठीमागील शेतात अज्ञात इसमाचा झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान काही दिवसापूर्वीच न्हावरे पोलीस ठाण्यात ऊसतोड मजूर बेपत्ता झाल्याच्या घटनेची नोंद गायकवाड यांचे बंधू विठ्ठल गायकवाड यांच्याकडून दाखल करण्यात होती.

पोलीस यंत्रणेने संबंधित मृतदेहाची ओळख पटावी यासाठी केलेल्या आवाहनानुसार  तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर व पोलीस मित्र भरत पवार यांनी संबंधित मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून वरील घटनेची त्यांना माहिती दिली. न्हावरे येथे मजुराचे नातेवाईक आल्यानंतर त्यांना या व्यक्तीची ओळख पटली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपीनाथ चव्हाण करत आहेत.

Web Title: suicide by strangulation of sugarcane workers in shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.