राहत्या घरी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Published: July 5, 2017 02:54 AM2017-07-05T02:54:35+5:302017-07-05T02:54:35+5:30
अठरा वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माळवाडी नं. २ येथे सोमवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : अठरा वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माळवाडी नं. २ येथे सोमवारी (दि.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
सोनाली बबन गायकवाड (वय १८, रा. माळवाडी नं. २) असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचा मावसभाऊ संतोष भगवान बनसोडे (रा. माळवाडी नं.२) याने या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक चौकशी करता, अशी माहिती मिळाली की, सोनालीच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. वडील आंधळे आहेत. आई मजुरी करते. सोनालीला बारावीला चांगले गुण मिळाले होते. पण पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने ती नैराश्यग्रस्त झाली होती. त्यातूनच तिने हे पाऊल उचलले.