मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:21 AM2017-11-23T01:21:58+5:302017-11-23T01:22:20+5:30

वेताळे (ता. खेड) येथे २२ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 Suicide by taking a life of mental and physical persecution, due to constant assault | मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Next

राजगुरुनगर : वेताळे (ता. खेड) येथे २२ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुजाता शरद बोंबले (रा. वेताळे, ता. खेड) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल नवरा, सासू-सासरा, दिर, नणंद यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सुजाता शरद बोंबले हिने सोमवारी (दि. २०) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत विश्वास शिवाजी ढोले (वय २१, रा. नवलाखउंब्रे, वडगाव मावळ, जि. पुणे) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पैसे परत देण्याच्या कारणावरून, तसेच नीट जेवण करता येत नाही व जेवणात मीठ नाही, म्हणून सतत शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला क्रूर वागणूक देऊन तिचे जगणे असह्य करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. याबद्दल वरील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मांडवे अधिक तपास करीत आहेत.
सुजाता हिच्या बहिणीकडून नवरा शरद रोहिदास बोंबले, सासरा रोहिदास देवराम बोंबले, सासू लक्ष्मीबाई रोहिदास बोंबले, दिर महादेव रोहिदास बोंबले, नणंद प्रमिला सुभाष मांजरे यांनीउसने पैसे आणले होते. ते पैसे बहिणीला देऊन टाका, असे सुजाता नवरा शरद याला सांगत होती.

Web Title:  Suicide by taking a life of mental and physical persecution, due to constant assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.