सिंहगडावर प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 18:34 IST2017-10-30T18:34:33+5:302017-10-30T18:34:59+5:30
पुण्यातील सिंहगडावर जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गडावरील कल्याण दरवाजाजवळ झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगलाने आयुष्य संपवले.

सिंहगडावर प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे - पुण्यातील सिंहगडावर जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गडावरील कल्याण दरवाजाजवळ झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगलाने आयुष्य संपवले. या घटनेमुळे सिंहगड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगडाच्या कल्याण दरवाज्याजवळ सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हे जोडपे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. हवेली पोलिसांकडून सध्या घटनेचा तपास सुरू आहे.
एका पर्यटकाने सिंहगडावरील वन सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हवेली पोलिसांना माहिती दिली. सिंहगडावर जाणाऱ्या घाटात दरड प्रतिबंधात्मक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असल्याने रस्ता बंद आहे. हे दोघे आतकरवाडीतून गडावर चालत गेले असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे.