मानसिक त्रास दिल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:28+5:302021-09-27T04:12:28+5:30
महिला सामाजिक कार्यकर्त्यासह चौघांवर गुन्हा दाखल सिंगापूर येथे एकाची आत्महत्या : महिला सामाजिक कार्यकर्त्यांसह चौघांवर गुन्हा लोकमत न्यूज ...
महिला सामाजिक कार्यकर्त्यासह चौघांवर गुन्हा दाखल
सिंगापूर येथे एकाची आत्महत्या : महिला सामाजिक कार्यकर्त्यांसह चौघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सासवड येथे सासरच्या आणि एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. सागर नानासो उरसळ (रा. सिंगापूर, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सागरची आई इंदुबाई नाना उरसळ (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे.
सासवड पोलिसांनी याप्रकरणी परवीन पानसरे (रा. आनंद पार्क, सासवड), सागरची पत्नी नंदा सुखदेव खेडेकर आणि तिची दोन्ही मुले सनी ऊर्फ सनीदेव सुखदेव खेडेकर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नंदा खेडेकर हिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. ती विभक्त राहत होती. परवीन पानसरे हिने तिचे लग्न सागर उरसळ याच्याबरोबर लावून दिले. त्यानंतर आरोपी परवीन पानसरे ही सागर यास प्रॉपर्टीच्या कारणावरून, तसेच त्या बदल्यात मोबदला मागण्यासाठी सतत मानसिक त्रास देत होती. या सर्वांच्या त्रासाला आणि मानसिक दडपणाला कंटाळून सागरने चौघांच्या नावाची चिठ्ठी लिहून विहिरीच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी सनी ऊर्फ सनीदेव सुखदेव खेडेकर आणि सिद्धार्थ सुखदेव खेडेकर या दोघांना अटक केली. परवीन पानसरे फरार असल्याचे सांगितले आहे.