ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 19:29 IST2018-05-21T19:29:35+5:302018-05-21T19:29:35+5:30
खेड येथे कॉलेजमध्ये बाहेरून शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय युवतीने आत्महत्या केली आहे.

ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत युवतीची आत्महत्या
वाकी बुद्रुक: पुणे नाशिक महामार्गालगत असणाऱ्या वाकी खुर्द गावात रहिवासी असलेल्या पूजा बाबुराव माने (वय २०) हिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीनिमित्त वाकी खुर्द येथे वास्तव्यास असलेले बाबुराव सिद्धीराम माने वय (५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पूजा ही खेड येथे कॉलेजमध्ये कलाशाखेच्या प्रथम वर्षाला (एफवायबीए) बाहेरून शिक्षण घेत होती. रविवारी ती खेडला क्लाससाठी गेली होती. दुपारी घरी आल्यानंतर जेवण करून घरासमोर असणाऱ्याखोलीत पाहिले असता तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट समोर आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.