आत्महत्या वाढताहेत; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:33+5:302021-06-19T04:08:33+5:30

कोरोनाचे संकट अनेकांना अस्वस्थ करत आहे. काहीजण कुटुंबापासून लांब असल्यामुळे किंवा ज्येष्ठ नागरिक घरात एकटे असल्यामुळे ते अधिक ...

Suicides are on the rise; The need for emotional, financial support! | आत्महत्या वाढताहेत; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

आत्महत्या वाढताहेत; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !

Next

कोरोनाचे संकट अनेकांना अस्वस्थ करत आहे. काहीजण कुटुंबापासून लांब असल्यामुळे किंवा ज्येष्ठ नागरिक घरात एकटे असल्यामुळे ते अधिक घाबरलेले आहेत. अशा वेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणे हे सुद्धा ताणाचे असू शकते. याउलट, अनेक जण नोकरी गमावल्यामुळे, व्यवसाय बंद पडल्याने वर्षभरापासून घरात आहेत. सतत २४ तास एकमेकांच्या सहवासात असल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये संघर्षाचे, वादावादीचे प्रमाण वाढले आहे. त्यातून घरगुती हिंसाचारातही लक्षणीय वाढ झाली आहे. घुसमट झाल्याने मानसिक समतोल हरवून बसले की आत्महत्येचा टोकाचा विचार केला जातो. यातून बाहेर पडायचे असेल तर जवळच्या व्यक्तीशी संवाद साधणे, आवडीच्या कामात वेळ व्यतीत करणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-----

आत्महत्यांचे वाढते प्रमाण :

वर्ष आत्महत्या स्त्री पुरुष

२०१९ ६२४ १८६ ४३८

२०२० ६७१ १६५ ५००

जून २०२१ पर्यंत २२२ १५९ ६२

-----

कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. प्रश्न हे सोडविण्यासाठीच असतात. त्यामुळे प्रत्येक संकटाकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. यापूर्वीही साथीचे रोग येऊन गेले आणि लोक त्यातून बाहेरही पडले. ताणतणावामुळे, नैराश्यामुळे झोप न लागणे, भूक न लागणे असे शारीरिक त्रासही दिसू लागतात. औषधोपचारांनी या समस्यांवर मात करता येणे शक्य आहे. मला आत्महत्या करावीशी वाटते, असे बोलून दाखवायला अनेक जण घाबरतात आणि स्वत:ला संपवण्याचा मार्ग पत्करतात. मात्र स्वतःला येणारा ताण ओळखून मनातले विचार जवळच्या व्यक्तींशी बोलून त्यातून मार्ग नक्कीच काढता येतो, हे स्वतःला समजवायला हवे. शारीरिक आजारामाणेच मानसिक आजारासाठीही डॉक्टरांची मदत घेता येते. मेंदूतील रसायनांचे प्रमाण बिघडल्यानेही मानसिक ताण निर्माण होतो. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतेच; ते सोडवण्याचा सकारात्मकतेने प्रयत्न करायला हवा.

- डॉ. अर्चना जावडेकर, मानसोपचारतज्ज्ञ

----------

आर्थिक, मानसिक दडपण असल्यास कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एकेमकांची काळजी घेतली पाहिजे, एकमेकांना मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने संवाद साधला पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याबाबत समाजात अजूनही टॅबू पहायला मिळतो. मात्र, शारीरिक तक्रारींसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतो, त्याचप्रमाणे मानसिक तणावातही उपचार गरजेचे असतात.

- डॉ. प्रकाश दास्ताने, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: Suicides are on the rise; The need for emotional, financial support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.